Posts

Marathi letter - requesting new dumpster in the area

 हडपसर परिसरातील 'सानेगुरुजी सोसायटी' येथील रहिवासी या नात्याने नवीन कचरापेटीची मागणी करणारे पत्र महानगरपालिका, आरोग्य अधिकाऱ्याला लिहा  प्रति, आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका            विषय : कचरा व्यवस्थापन आणि परिसरातील स्वच्छतेबाबत मा. महोदय  सादर प्रणाम. मी हडपसर परिसरातील 'साने गुरुजी सोसायटी' येथील रहिवासी आहे. या पत्राद्वारे परिसरातील अस्वच्छतेच्या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधू इच्छिते.  आमच्या भागात काही दिवसांपासून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात खूप दुर्गंधी पसरली आहे आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होत आहे.  नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून, कृपया आमच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी आणि कचरा व्यवस्थापनासाठी नवीन कचरापेटी उपलब्ध करून द्यावी हि नम्र विनंती. या विषयी आपले सहकार्य मिळेल अशी आशा आहे. तसदीबद्दल क्षमस्व. आपली कृपाभिलाषी, अ. ब. क.   

Shivjayanti Speech 2026

 शिवाजी महाराज - 'ध्येय, धैर्य आणि धाडस' - एक आदर्श  निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारु  अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी!      नमस्कार, मी किमया चिटणीस , आज आपल्या समोर शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने बोलायला उभी आहे.       वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरासमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतानाच शिवरायांनी आपले ध्येय निश्चित केले होते. शिवराय एक धैर्यशील, धाडसी व प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी दाखवून दिले कि कमी सैन्य असले तरी बुद्धीच्या जोरावर मोठ-मोठ्या साम्राज्यांना देखील हरवता येते.      सर्व प्रथम बोलूया गनिमी काव्या विषयी. गनिमी कावा म्हणजे छोट्या-छोट्या टोळ्यांनी झटपट हल्ला करणे, शत्रुला गोंधळात टाकणे आणि नंतर डोंगर-जंगलात लुप्त होणे. हे युद्ध फक्त ताकदीचे नव्हे तर युक्तीचे आणि धाडसाचे होते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी आणि मावळ्यांच्या धैर्याने हे साध्य झाले.      याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे - प्रतापगडाची लढाई! विजापूर दरबारचा अफझल खान मोठ्या फौजेनिशी महाराजांना संपवायला आला होता. पण महाराजा...

marathi article - the serpent's revenge book review

पुस्तक अभिप्राय - द सर्पांट्स रिवेंज (सर्पाचा सूड)   मला वाचनाची खूप आवड आहे आणि विशेषतः पौराणिक कथा मला खूप आवडतात. माझ्या आजीने मला सुधा मूर्ती यांचे 'द सर्पन्ट्स रिव्हेंज – अनयुझ्युअल टेल्स फ्रॉम द महाभारत' नावाचे पुस्तक भेट दिले.  या शीर्षकाचा अनुवाद आहे 'सर्पाचा सूड - महाभारतातील न ऐकलेल्या कथा'. सुरुवातीला, मला ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती. पण जसजसे मी त्यातील कथा वाचत गेले, तसतसे ते पुस्तक अधिकच मनोरंजक वाटू लागले आणि नकळतपणे माझे लक्ष त्यात गुंतले. हे पुस्तक महाभारतासारख्या सुप्रसिद्ध प्राचीन महाकाव्यावर आधारित आहे, परंतु त्यात सांगितलेल्या कथा फारश्या  प्रसिद्ध नाहीत. प्रत्येक कथा मनोजरंजक तर आहेच पण कधीकधी आश्चर्याचे धक्के देखील देते. कथेच्या शेवटी, लेखिका त्या कथेबद्दल काहीतरी खास लिहितात. त्या कथेत घडलेल्या घटनेशी संबंधित ठिकाण, सध्याचे उत्सव किंवा समाजावरील परिणाम यांसारखी माहिती त्या देतात. हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे आणि असे मी आजपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकात पाहिलेले नाही. माझी आवडती कथा भीमाचा नातू बर्बरीक याची आहे. ही कथा त्याच्या तीन शक...

Hindi debate - Social media ban for children up to 16 years

आदरणीय शिक्षक और विद्यार्थी मित्रों , आज, मै "सोलह साल तक के किशोरों के लिए सामाजिक माध्यमों के प्रयोग पर पूरी तरह से निर्बंध लगाने" के विचार के विरोध में मजबूती से खड़ी हूँ |  इस विषय में पूरी तरह से पाबन्दी लगाना ना तो व्यावहारिक है और ना ही लंबे समय के दौरान फायदेमंद।  सामाजिक माध्यम आज की दुनिया में संवाद का सबसे महत्वपूर्ण साधन है। इस माध्यम से किशोर आपस में बातचीत करते है और जुड़े रहते है। नई चीजों के बारे में सीखते भी है। इस पर पूरी तरह से निर्बंध लगाने से किशोर अलग-थलग पड़ जायेंगे। उनकी सामाजिक जिंदगी में रूकावट आ सकती है।  सामाजिक माध्यम जानकारी हासिल करने का और नई कला सीखने का एक ताकतवर साधन है। किशोर वयीन बच्चे इसका इस्तेमाल छायाचित्रण, संगीत, बागवानी एवं नृत्य ऐसी पाठ्येतर गतिविधियाँ जानने के लिए करते है। उनके शौक और जिज्ञासा को समझने का यहाँ अवसर मिलता है। इस पर रोक लगाना मतलब कुछ ऐसा है, जैसे उनसे कहना की आप पुस्तकालय नहीं जा सकते क्यों की कुछ किताबें नुकसानदायक हो सकती है।  सम्पूर्ण निर्बंध लगाना व्यावहारिक उपाय नहीं हो सकता।  कई बार पाबंदियाँ असल मे...

My dream - national competition

मेरा राष्ट्रीय प्रतियोगिता का सपना       मुझे खेलकूद पसंद है। वैसे तो सभी बच्चों को पसंद होती है, लेकिन मैं इसमें कुछ ज्यादा ही दिवानी  हो जाती हूँ। पिछले साल (2024) छठी कक्षा में हमारे कराटे के सर और खो-खो की शिक्षिका ने मुझे इसमें बढ़ावा दिया।       अतुल सर हमारा कराटे का जमकर अभ्यास लेते थे। मुझे नए-नए पैतरें और व्यायाम सिखाते थे। इससे मुझे अपना कराटे का कौशल पूरी ताकत और फुर्ती से दिखाने में मदद होती थी। पहली प्रतियोगिता की पहली श्रृंखला में मैंने आसानी से जीत हासिल कर ली। लेकिन दुसरी दौर में थोड़ी कमजोर पड़ गयी और मुझे हार का सामना करना पड़ा। मेरे शिक्षक और माता-पिता ने मेरा हौसला बनाए रखा।      इस साल (2025) अतुल सर ने मुझे और कड़ी मेहनत करने को प्रोत्साहित किया। उन्होंने मेरी और कुछ चुनिंदा लड़कियों की अलग से तालिम लेना शुरू कर दिया। जब भी हमें समय मिलता, तब हम कराटे के अभ्यास में जुट जाते। मै कई बार थकी हारी घर लौटती। लगता था की क्या सच में इतनी मेहनत करना जरूरी है ? पिताजी मेरा मनोबल बढ़ाते रहते और मेरी उर्जा बनाए रखते। ...

Debate: Voting to be mandatory - Yes or No

मतदान अनिवार्य होना चाहिए - हाँ या ना ? लोकतंत्र का अर्थ है 'जनता का शासन'| नागरिकों द्वारा चुने गए प्रतिनिधी शासन व्यवस्था चलाते है। वे किसी छोटे समूह का नहीं बल्कि पूरी जनता का प्रतिनिधित्व करते है।  अगर लोग मतदान नहीं करेंगे तो सारी जनता का सही मायनों में प्रतिनिधित्व नहीं होगा। ऐसी शासन व्यवस्था को जनता का राज्य कहना मुश्किल होगा।  मतदान हमारा नागरिक कर्तव्य है। हम जैसे कानून का पालन करते है, अपनी आमदनी पर कर भरते है ,उसी तरह से मतदान करना भी कानूनन जरूरी होना चाहिए। इससे हमारी जवाबदेही बनी रहेगी।  जब हम मतदान अनिवार्य करेंगे तो देश के नेता "वोट बँक " जैसी राजनीती नहीं कर पायेंगे। किसी एक छोटे समुदाय को लुभाने के बजाये पुरे देश के मुद्दों पर ध्यान केंद्रित करने के लिए मजबूर हो जायेंगे।  लोगों की राजनितिक समझ बढ़ेगी और समाज जागरूक होगा। हमें उम्मीदवारों के बारे में जानकारी लेनी होगी। अभ्यास करना होगा। परख करनी होगी।  अगर उम्मीद्वार सही नहीं है तो आज भी हमारे देश में NOTA मतलब 'इन में से कोई भी नहीं ' यह चुनने का विकल्प है।  हमारे लोकतंत्र को और मजबूत बनान...

शाळेची संस्मरणीय सहल

शाळेची संस्मरणीय सहल       नमस्कार! माझे नाव किमया चिटणीस. मी इयत्ता सहावीत शिकत आहे . मी गेली आठ वर्ष Wisdom World School, Hadapsar या शाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोनाचा काळ सोडला तर दर वर्षी शाळा आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला (excursion) घेऊन जाते .      या वर्षी आम्ही 'निराली ढाणी' या ठिकाणी गेलो होतो. ' ढाणी' या शब्दाचा राजस्थानी अर्थ आहे छोटासा कसबा!  'निराली ढाणी'  हि एक दिवसीय सहलीसाठी खूप छान जागा आहे. राजस्थानी संस्कृती आणि साहसी खेळ यांचा तिथे एकत्र अनुभव घेता आला.      २३ सप्टेंबरचा सोमवार हा माझ्यासाठी वेगळा आणि उत्साही होता. शाळेची बस आम्हा सगळ्याना घेऊन सकाळी आठ वाजता निघाली. खरं तर मला बस प्रवासाची जरा भिती वाटते पण त्या दिवशी मित्र-मैत्रिणीं सोबत वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. आमच्या वर्गशिक्षिका इलहम मॅम पण आमच्या सोबत बसमध्ये मजा करत होत्या. त्यांनी छान गाणी लावली होती.      सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर मला तर प्रचंड भूक लागली होती. गरमा-गरम पोहे आणि इडलीची चव मस्त होती. नाश्त्यानंतर आम्ही आमचे...